बंद

    प्रस्तावना

    राज्यातील ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक तसेच व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक पाठबळाअभावी अडचणी येतात. अशा घटकांना आर्थिक सहाय्य मिळण्याकरीता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी होत आहे. सदर घटकातील पात्र लाभार्थ्यांना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी शासनामार्फत आर्थिक सहाय्य करण्याचे नियोजित आहे. त्यासाठी ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.